Wednesday, December 23, 2009

टॅग अलाँग...

पहिलेच सांगतो की मला कुणीच टॅग केलेलं नाही. वेल, तसंही म्हणता येणार नाही कारण 'सहजच'ने लिहून ठेवलंय की जे जे राहीलेत त्यांना ती टॅग करतेय. खरं सांगू का? हा टॅगा टॅगीचा खेळ पाहिला आणि मन भूतकाळात गेलं... कॉलेज संपताना मित्र-मैत्रिणींचे भरलेले स्लॅमबुकं आणि डायर्‍या आठवल्या... आणि परत तो खेळ खेळ खेळावासा वाटला... म्हणून कोणी टॅगलेलं नसतानाही, माझी या खेळात थोडी भर.

1.Where is your cell phone?
इथंच, पडलाय निवांत माझ्या बाजूला. कालच याच्याबद्दल पोस्ट टाकलं म्हणून स्वारी खुश आहे!

2.Your hair?
थोडे थोडे पांढरे व्हायला लागलेत. मागे कुणीतरी म्हणालं होतं की हुशार लोकांचे केस लवकर पांढरे होतात म्हणून... तसं असतं तर माझे केस याआधीच आणि आहेत त्याहून जास्त पांढरे व्हायला हवे होते.

3.Your mother?
खूप साधी, खूप प्रेमळ...

4.Your father?
थोडे तापट वाटतात, पण हळवे आणि प्रेमळ

5.Your favorite फूड
सध्या तरी स्वतः करून खात असल्याने, जे काही आयतं मिळेल ते...

6.Your dream last night?
स्वप्नं क्वचितच पडतात.... कधी कधी कलर तर कधी कधी ब्लॅक अँड व्हाईट स्वप्नं! आहे की नाही गम्मत?

7.Your favorite drink?
आलं वेलची घातलेला चहा.

8.Your dream/goal?
ओह माय गॉड, इट्स हर...

9.What room are you in?
बेडरूम

10.Your hobby?
मित्रांबरोबर भटकायला जाणे... गप्पा मारणे, मुव्हीज बघणे

11.Your fear?
काकाकडे उन्हाळ्यात सुट्टीसाठी जायचो त्यावेळी रात्री गच्चीवर झोपायचो सगळे.... अंगणातल्या नारळाच्या झाडावरच्या 'ठक-ठक'ची (रा़क्षस, भूत, काय का असेना) अजूनही भिती वाटते.

12.Where do you want to be in 6 years?
भारतात.

13.Where were you last night?
फिजीकली इथंच बेडरूम मधे, पण मन मात्र कुठंतरी भटकायला गेलं होतं.

14.Something that you aren’t?
फेक. म्हणजे तोंडावर एक आणि पाठ फिरली की एक असं नाही माझं.

15.Muffins?
हो तर... बनाना नट मफीन आवडतं मला.

16.Wish list item?
कॅनन किंवा निकॉनचा एस.एल्.आर कॅमेरा... सध्यातरी एवढंच.

17.Where did you grow up?
उमरखेड... विदर्भात आहे.

18.Last thing you did?
किचनचा ओटा साफ केला.

19.What are you wearing?
पायजामा आणि टी.

20.Your TV?
गराज सेलमधून उचललेला आहे.

21.Your pets?
नोप. घरी अजीबात नको.

22.Friends
भरपूर आहेत, मात्र अगदी जवळचे खूप थोडे.

23.Your life?
चाललंय निवांत!

24.Your mood?
फ्रेश

25.Missing someone?
हो तर... घरच्या सगळ्यांना मिस करतोय.

26.Vehicle?
होन्डा अ‍ॅकॉर्ड.

27.Something you’re wearing?
अरमानी कलोन.

28.Your favorite store?
एवढ्यात स्टार-बक्स.

Your favorite color?
ब्लॅक

29.When was the last time you laughed?
आताही हसतोय... एकेकाचा चेहराच असतो हसरा.

30.Last time you cried?
भारतातून इथं परत येताना... अगदी थोडंसं!

31.Your best friend?
खूप कमी आहेत, आणि जे आहेत त्यांना ते माहीत आहे.

32.One place that you go to over and over?
ऑफीस?

33.One person who emails me regularly?
रेगुलरली मेल करायला कोणाला वेळ आहे?

34.Favorite place to eat?
आयतं करून खाऊ घालणारा/री जिथे बोलवील ती जागा.
________

मी माझी पोस्ट जो कोणी वाचेल त्याला टॅग करतो. Let's tag along...

-अनामिक

7 comments:

अपर्णा said...

सही आहे...अरे स्लॅमबुकचं मलाही आठवायला हवं होतं....आणि तूही सगळ्यांना टॅग केलं ते बरंच केलंस..आता २०१० पर्यंततरी टॅगाटॅगी होईल...
आपलं बनाना वॉलनट आणि फ़ेक बाबतीत जुळतंय...:)

अनामिक said...

@ अपर्णा... तुझ्या या आणि आधीच्या कॉमेंट्सकरता धन्स! आणि हो, मला बनाना नट मफीन कधीही चालतं :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

तुम्हाला टॅगलंय

आनंद पत्रे said...

मस्त लिहिलेय....

अनामिक said...

@कांचन - अगं तुला स्वप्नं तरी पडतात... मला तर बारीक झाल्याचं स्वप्नही पडत नाही!

@आनंद - धन्यवाद!

Anonymous said...

अरे वा . तुमी त भाउ आपल्या यवतमाळजवळचे.. लई बेस.. बरं वाटलं बगा..

अनामिक said...

@महेंद्र काका, तुम्ही नागपूरचे की यवतमाळचे? मलापण आपल्या विदर्भातला माणूस बघून लई आनंद होऊन राहिलाय!